आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास:सायगाव शिवारात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह ; मेहुणबारे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

चाळीसगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सायगाव शिवारात एका शेतात निंबाच्या झाडाला ठिबकच्या नळीने गळफास घेतलेल्या अवस्थेत अनाेळखी २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. मंगळवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. या तरुणाची ओळख पटली नसून घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सायगाव शिवारातील आरिफ अलीमुल्ला यांच्या शेतात निंबाच्या झाडाला ठिबकच्या नळीने गळफास घेतलेल्या अवस्थेत हा तरुण दुपारी आढळला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मेहुणबारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हवालदार मिलिंद शिंदे व गोरख चकोर यांनी पंचनामा करून मृतदेह मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला. काळा सावळा चेहरा, अंगात पांढरा शर्ट व निळ्या रंगाची जीन्स असे तरुणाचे वर्णन आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली. तरुणाची ओळख पटवण्याचे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...