आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाप्रसादाचा लाभ:राष्ट्रनिर्माण धर्मसोहळ्यात 300 क्विंटल साखरेच्या बुंदीचा प्रसाद

चाळिसगांव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोंडगाव येथील राष्ट्रनिर्माण धर्मसोहळ्याचा आज (दि.५) समारोप होत आहे. त्यानिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ३०० क्विंटल साखर आणि तेवढीच हरभरा डाळ वापरून बुंदी पाडण्यात आली आहे. सुमारे ५० हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेणार आहेत. दुपारपासून महाप्रसादाच्या वाटपाला सुरूवात होईल.

१६ तालुक्यांचे कारागीर राबले १० दिवस १६ तालुक्यांमधील कारागीर आणि ४५ सेवेकऱ्यांच्या माध्यमातून हा महाप्रसाद तयार करण्यात आला आहे. त्यात गोंडगाव, वडाळे ,कजगाव, करमाड व पारोळा येथील सेवेकऱ्यांचा समावेश आहे. जय बाबाजी भक्त परिवारातील सेवेकरी विनामोबदला काम करत आहेत. दहा दिवसांत कारागिर व सेवेकऱ्यांनी बुंदीचा महाप्रसाद तयार केला.

२० लाखांचा खर्च... जय बाबाजी परिवारातील भाविकांनी या महाप्रसादासाठी सुमारे २० लाखांचा खर्च केला आहे. महाप्रसादात मसाले भाताचाही समावेश आहे. चार ट्रॅक्टरवर महाप्रसादाचे वाटप होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...