आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:मेहुणबारे येथे पदाधिकाऱ्यांचा सत्कार

मेहुणबारे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावाचे कान, नाक, डोळे म्हणून पोलिस पाटलांच्या जबाबदारीकडे पाहिले जाते. निष्पक्षपातीपणे आपली भूमिका बजावल्यास पोलिस पाटील हा लोकप्रिय होण्यास मदत होते, असे प्रतिपादन रेगावचे माजी सरपंच भैय्यासाहेब पाटील यांनी व्यक्त केले आहे.

मेहुणबारे पोलिस स्टेशनच्या आवारात जळगाव जिल्हा पोलिस पाटील संघटनेच्यावतीने राज्य पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मेहुणबारे पाेलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड, पीएसआय प्रकाश चव्हाणके ,नूतन राज्य उपाध्यक्ष मधुकर पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष हेमराज पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, राज्य संघटक भाऊसाहेब पाटील, संघटनचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र शिंदे, बाजार समितीचे माजी सभापती मच्छिंद्र राठोड, भाऊसाहेब पाटील, धरणगाव तालुकाध्यक्ष किशोर भदाणे, जिल्हा संघटक दीपक पाटील, चाळीसगाव तालुकाध्यक्ष जीवन पाटील उपस्थित होते.

खासदारांमुळे मानधन दुप्पट
यावेळी खासदार उन्मेष पाटील यांच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. राज्य उपाध्यक्ष मधुकर पाटील म्हणाले, पोलिस पाटील यांचे मानधन दुप्पट होण्यासाठी तत्कालीन आमदार उन्मेष पाटील यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. त्यामुळे आमचे मानधन दुप्पट झाले.

बातम्या आणखी आहेत...