आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेंडी:45 दिवसात येणारी भेंडी 60 दिवस उलटूनही आली नाही, शेतकरी हैराण ; कृषी मंत्र्यांनी फोन करुन शेतकऱ्यास दिला प्रतिसाद

तळेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भेंडी बियाण्याबाबत जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील शेतकरी राहुल विश्वनाथ पाटील यांची फसवणूक झाली आहे. याबाबत राहूल पाटील यांनी थेट राज्याच्या कृषी मंत्र्यांकडे तक्रार केली असून त्यांच्या तक्रारीबाबत कृषी मंत्र्यांनी प्रतिसादही दिला आहे. भेंडी बियाण्यात फसवणूक झाल्याप्रकरणी पळासखेडा येथील राहुल पाटील यांनी थेट कृषिमंत्री यांच्याशी संपर्क साधला. परंतु, कृषी मंत्री बैठकीत व्यस्त असल्याने त्यांचे बोलणे झाले नाही. मात्र, दुसऱ्याच दिवशी स्वतः कृषिमंत्री दादा भुसे यांनी राहुल पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. तुमची तक्रार व त्या संदर्भातले जी कागदपत्रे असतील, ती स्पीड पोस्टाने पाठवा, निश्चितच तुमच्या तक्रारीची दखल घेतली जाईल, असे पाटील यांना आश्वासन दिले. दरम्यान, राहुल पाटील यांनी जामनेर येथील कृषी अधिकारी व पंचायत समितीकडे ही या संदर्भात तक्रार केली आहे. दरम्यान, राहुल पाटील यांनी दोन एकरात ऍडव्हांटा कंपनीच्या राधिका या भेंडी वाणाची २ एप्रिल २०२२मध्ये लागवड केली. ४५ दिवसानंतर भेंडी काढणीवर येते. परंतु, पाटील यांना अद्यापही उत्पन्न मिळालेच नाही.

बातम्या आणखी आहेत...