आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळीसगावात पाेलिस यंत्रणेवर ताण:शिक्षण संस्था, ग्रा.पं.चे एकाच दिवशी मतदान

चाळीसगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्याच दिवशी तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींचेही मतदान आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेपुढे बंदोबस्ताचा मोठा ताण पडणार आहे.तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यात उंबरखेड, मेहूणबारे, दरेगाव, सांगवी, शिदवाडी, चिंचखेडे, डामरूण, हिंगोणेसीम, आडगाव, पिंपळवाड म्हाळसा, वलठाण, अंधारी, गणेशपूर, उपखेड, करजगाव, विसापूर या गावांचा समावेश आहे. त्यातही उंबरखेड आणि मेहुणबारे ही दोन मोठी गावे आहेत.

या ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान आहे. गावगाड्याच्या निवडणूका असल्याने पोलिस बंदोबस्त हमखास लागतो. या पार्श्वभूमीवर १६ गावांमध्ये १८ डिसेंबरला पोलिस बंदोबस्त असेल. तर दुसरीकडे तीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या, तालुक्यातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूकही १८ डिसेंबरलाच आहे. या निवडणूकीसाठी सभासद मर्यादीत असले तरी मोठी संस्था असल्याने मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी बंदोबस्त लागेल.

दोन दिवस मतमोजणी : राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळासाठी मतदान १८ डिसेंबर रोजी होणार असून मतमोजणी दुसऱ्या दिवशी १९ डिसेंबरला आहे. तर १६ ग्रामपंचायतींची मतमोजणी २० डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी संस्थेची तर दुसऱ्या दिवशी १६ ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार असल्याने, १८ ते २० डिसेंबर हे तीन दिवस प्रशासनाची कसोटी घेणारे असतील.

बातम्या आणखी आहेत...