आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रामाणिकपणा:खात्यात चुकून आलेले एक लाख रुपये परत, धरणगावातील संजय तोडे यांचा प्रामाणिकपणा

धरणगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील संजय तोडे यांच्या बँक खात्यात अचानक एक लाख १० हजार रुपये जमा झाले. त्यांनी लागलीच बँकेशी संपर्क साधून संबंधितांना ही रक्कम प्रामाणिकपणे परत केली.

४ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते तसेच धरणगाव महाविद्यालयचे कर्मचारी संजय तोडे यांच्या युनियन बँक खात्यात एक लाख १० हजार रुपये जमा झाले. लागलीच त्यांना मोबाईलवर याबाबत एसएमएस आला. त्यामुळे चुकून आपल्या खात्यात पैसे आल्याची माहिती तोडे यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना कळवली. तोडे यांना काही वेळाने लक्ष्मण सुर्यवंशी (रा.बांभोरी) जे सध्या पुण्यात कामाला आहेत, त्यांनी काॅल केला, तसेच खाते क्रमांक चुकल्यामुळे माझ्या आईच्या खात्याऐवजी तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे सांगितले. यावेळी बँक अधिकाऱ्यांनी सूर्यवंशी यांना दिलासा दिला. त्यानुसार ६ रोजी तोडे यांनी पुष्पावती फकीरा सूर्यवंशी याच्या नावाने धनादेश देऊन, खात्यात आलेले पैसे परत केले. त्यांचे कौतूक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...