आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन निकाल:अमळनेरातील 3,324 विद्यार्थ्यांचा आज बारावीचा ऑनलाइन निकाल ; विद्यार्थ्यांचे लक्ष

अमळनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या काळानंतर यंदा बारावीची ऑफलाइन परीक्षा झाली. त्यामुळे निकालाची अधिक उत्सुकता आहे. तालुक्यातील ३,३२४ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. त्यामुळे आज जाहीर होणाऱ्या ऑनलाइन निकालाकडे या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. यंदा बारावी बोर्डाच्या परीक्षा ४ मार्चपासून सुरु झाल्या आणि ७ एप्रिलला संपल्या होत्या. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर होतात. बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाल्यानंतर लगेच शिक्षक पेपर तपासणीला सुरुवात करतात. मात्र यंदा दहावी, बारावीचे निम्मे पेपर होऊनही विनाअनुदानित शिक्षकांनी एकही पेपर तपासायला घेतला नव्हता. त्यामुळे निकाल उशिरा लागण्याची भीती होती. परंतु आज बारावीचा निकाल जाहीर होत असल्याने विद्यार्थी आणि पालकांची चिंता काहीशी मिटली आहे. लवकरच दहावीच्या निकालाची तारीखही जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. यंदा विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा दिली. कोरोना काळात लिखाणाचा सराव सुटल्याने त्यांना परीक्षेकरिता अतिरिक्त वेळ देण्यात आला होता. तसेच अभ्यासक्रमातही कपात करण्यात आली होती. त्यामुळे निकालाची उत्सुकता अधिक आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आपापल्या शाळेतच काही दिवसांनी गुणपत्रक मिळेल.

चाळीसगावात १२६५ विद्यार्थी शहरातील तीन महाविद्यालयांमधून १२६५ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. त्यात बी.पी.आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, कोतकर महाविद्यालयात ७११ विद्यार्थी, राष्ट्रीय ज्युनियर कॉलेजमधून १९३ विद्यार्थी व ५ विद्यार्थी रिपीटर असे १९८ विद्यार्थी, तर जयहिंद महाविद्यालयात ३५६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांची निकालाची उत्सुकता आज संपणार आहे. मुलांपेक्षा मुली सरस ठरणार का? किती टक्के निकाल लागणार याकडे लक्ष लागले आहे. गेल्यावर्षी मुली तालुक्यात सरस ठरल्या होत्या. ऑनलाइन निकाल घरी अथवा इंटरनेट कॅफेवर जाऊन पाहता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...