आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:पाचोऱ्यात 14 जागांवर महिलांना संधी ; अनुसूचित जातीच्या महिलांचे आरक्षण

पाचोरा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालिकेची आरक्षण सोडत सोमवारी दुपारी ३ वाजता पालिका सभागृहात काढण्यात आली. २८ पैकी १४ जागांवर महिलांना संधी मिळाली आहे. यात प्रभाग २ अ व ६ अ मधे अनुसूचित जातीच्या महिलांचे आरक्षण आहे. तर प्रभाग ३ अ, ४ अ, ५ अ, ६ ब, ७ ब, ८ अ, ९ अ, १० अ, ११ अ, १२ अ, १३ अ व १४ अ अशा १२ जागेवर सर्व साधारण महिलांना संधी मिळणार आहे. आरक्षण सोडतीत माजी नगरसेवक अशोक मोरे, धर्मेंद्र चौधरी, भूषण वाघ यांच्या प्रभागात महिलांचे आरक्षण निघाले आहे. त्यामुळे त्यांना प्रभाग बदलावा लागेल. किंवा त्यांच्या कुटुंबातील महिलांना उमेवारी द्यावी लागेल. सुचेता वाघ यांचाही प्रभाग सर्वसाधारण जागेसाठी राखीव झाल्याने त्यांना सर्वसाधारण जागेतून निवडणूक लढवावी लागेल. देवांश प्रमोद महाजन व गित जितेंद्र महाजन या बालकांनी चिठ्ठ्या काढल्या. यांचे प्रभाग सुरक्षित विद्यमान नगरसेवक पंडित शिंदे, विजया शिंदे, संजय वाघ, वासुदेव महाजन, हर्षाली जडे, राम केसवाणी, विकास पाटील, सुनिता पाटील, विकास पाटील, मालती हाटकर, सतिष चेडे यांना दिलासा मिळाला आहे.

आरक्षण असे प्र.(१) अ अनु. जाती (महिला) (१) ब- सर्वसाधारण प्र.(२) अ अनु. जाती (महिला) (२) ब- सर्वसाधारण प्र.(३) अ सर्वसाधारण (महिला) (३) ब- सर्वसाधारण प्र.(४) अ सर्वसाधारण (महिला) (४) ब- सर्वसाधारण प्र.(५) अ सर्वसाधारण (महिला) (५) ब- सर्वसाधारण प्र.(६) अ अनू. जमाती (६) ब- सर्वसाधारण (महिला) प्र.(७) अ अनू. जाती (७) ब- सर्वसाधारण (महिला) प्र.(८) अ सर्वसाधारण (महिला) (८) ब- सर्वसाधारण प्र.(९) अ सर्वसाधारण (महिला) (९) ब- सर्वसाधारण प्र.(१०) अ सर्वसाधारण (महिला) (१०) ब- सर्वसाधारण प्र.(११) अ सर्वसाधारण (महिला) (११) ब- सर्वसाधारण प्र.(१२) अ सर्वसाधारण (महिला) (१२) ब- सर्वसाधारण प्र.(१३) अ सर्वसाधारण (महिला) (१३) ब- सर्वसाधारण प्र.(१४) अ सर्वसाधारण (महिला) (१४) ब- सर्वसाधारण

बातम्या आणखी आहेत...