आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:पैसे घेऊनही हरितगृह न उभारल्याने भरपाईचे आदेश

अमळनेर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतात हरितगृह उभारण्यासाठी रक्कम घेऊनही काम पूर्ण न करणाऱ्याला ग्राहक मंचाने नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.अशोक वना बाविस्कर (रा.गांधली) यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी शेतात २० गुंठा जागेत हरितगृह उभारण्यासाठी समृद्धी ग्रीन हाऊस कन्स्ट्रक्शनचे सचिन उत्तम मोरे यांना पैसे दिले होते. त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला होता.

त्यानुसार ७२० रुपये प्रति चौरस मीटरप्रमाणे काम देऊन ११ हजार रुपये बयाना दिला होता. तसेच वेगवेगळे दोन धनादेश देऊन पाच लाख रुपये दिले होते. उर्वरित ६ लाख ८० हजार रुपये शासकीय अनुदान आल्यावर देण्याचे ठरून कामाचा करारनामा केला होता. त्यानुसार तक्रारदारांनी दोन लाख २० हजार रुपयांचे साहित्य आणून काम सुरु केले. मात्र कंपनीने फक्त पाइप आणून खड्डे खोदले होते. त्यानंतर काम अपूर्ण सोडले होते. वारंवार संपर्क साधूनही मोरे याने प्रतिसाद दिला नाही.

म्हणून तक्रारदाराने भरपाई म्हणून व्याजासह ३८ लाख ३१ हजार रुपये मिळावेत अशी मागणी केली. त्यानुसार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने सचिन उत्तम मोरे याने, तक्रारदार बाविस्कर यांना पाच लाख ६९ हजार ४५० रुपये तक्रार दाखल तारखेपासून ९ टक्के व्याजाने परत करावे. तसेच त्रासाबद्दल ५० हजार व अर्जाचा खर्च पाच हजार रुपये परत करण्याचे आदेश दिले. तक्रारदाराकडून अॅड.भारती अग्रवाल यांनी युक्तिवाद केला. ग्राहक मंचाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

बातम्या आणखी आहेत...