आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरातील काही देशांमध्ये कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. त्यामुळे आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. मात्र, ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, केवळ स्टॅबिलायझरअभावी धूळ खात पडून आहे. मागील काळातील अनुभव पाहता पाचोरा ग्रामीण रुग्णालयात, आरोग्य विभागाने रुग्णालयाची स्वच्छता केली.
रुग्णालयात असलेल्या खाटा, बेड, फॅन, वीजपुरवठा, औषधसाठा, जम्बो सिलिंडर, ओटू पाइपलाइन अद्ययावत केली. तसेच एक प्रभारी वैद्यकीय अधिकारी, दोन वैद्यकीय अधिकारी, तीन आयुष वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती केली असून, ३० बेड, २५ ओटू बेड, दोन व्हेंटिलेटर, १० हजार लिटरचे दोन ऑक्सिजन प्लांट सज्ज ठेवले आहेत.
आमदार किशोर पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मिनिटाला १ हजार लिटर अॉक्सिजन निर्मिती क्षमतेचा प्रकल्प, ग्रामीण रुग्णालयात उभारला होता. याचे उद्घाटन स्वतः आमदार पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नागोजीराव चव्हाण, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रम बांदल तहसीलदार कैलास चावडे, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अमित साळुंखे यांच्या उपस्थितीत झाले होते. मात्र, स्टॅबिलायझरअभावी हा प्रकल्प सध्या बंद आहे. प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे.
दीड लाख रुपये किंमत
ऑक्सिजन प्रकल्पाला सुरळीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी स्टॅबिलायझरची गरज असते. त्याची किंमत दीड ते दोन लाख रुपये आहे. मात्र, प्रशासनातर्फे स्टॅबिलायझर खरेदी केली जात नसल्याने ऑक्सिजन प्रकल्प बंदच आहे. त्यामुळे उपाययोजना आवश्यक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.