आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व एरंडोल विभाग क्रीडा समिती मारवड अंतर्गत, महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा येथे, दि.१० व ११ नोव्हेंबरला आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून डॉ.निर्मल टाटिया हे उपस्थित राहणार आहेत.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा येथील बालरोगतज्ञ डॉ.नीता जयस्वाल, सपना टाटिया, महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड.संदीप पाटील, संस्थेच्या सचिव डॉ.स्मिता पाटील, कै. म.तु.पाटील महाविद्यालय, मारवड येथील एरंडोल क्रीडा समितीचे सचिव डॉ.देवदत्त पाटील, विविध महाविद्यालयातील क्रीडा संचालक, प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल. चौधरी, उपप्राचार्य एन.एस.कोल्हे, प्रा.डॉ. के. एन. सोनवणे उपस्थित राहतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.