आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्बाेधन कार्यशाळेत महिलांना कायद्यांचे ज्ञान‎:महिला दिनानिमित्त पाचाेरा तालुका विधी सेवा समिती

पाचोरा‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,‎ दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालय व ‎ ‎ मुंबई येथील महाराष्ट्र राज्य विधी‎ सेवा प्राधिकरणाने ४ ते ११ मार्च या ‎ ‎ काळात महिला दिनानिमित्त‎ महिलांसाठी शिबिराचे आयोजन ‎ ‎ करण्याचे निर्देशित दिले अाहेत. त्या ‎ ‎ अनुषंगाने पाचोरा तालुका विधी‎ सेवा समिती व वकील संघाच्या‎ संयुक्त विद्यमाने तालुक्यातील‎ नगरदेवळा येथे महिलांसाठी‎ उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन‎ करण्यात आले हाेते.‎ या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी‎ पाचोरा न्यायालयाचे सहदिवाणी‎ न्यायाधीश एम. जी. हिवराळे तर‎ ‎ साधन व्यक्ती म्हणून बालविकास‎ संरक्षण अधिकारी जिजाबाई राठोड,‎ ज्येष्ठ विधिज्ञ सुनील पाटील,‎ पोलिस उपनिरीक्षक विजया वसावे,‎ नगरदेवळा येथील सरपंच प्रतीक्षा‎ काटकर उपस्थित होत्या.

यांनी दिली महिलांना‎ विविध कायद्यांची माहिती‎ जिजाबाई राठोड यांनी महिलांचे‎ मालमत्ता अधिकार तसेच कौटुंबिक‎ हिंसाचार, विजया वसावे यांनी‎ हुंडाबळी, अॅसिड हल्ला, अपहरण,‎ पोक्सो कायद्यावर तर अॅड. सुनील‎ पाटील यांनी महिलांच्या‎ आरोग्याविषयी, गर्भलिंग निदान‎ कायदा तर आर. के. माने यांनी‎ कौटुंबिक कायद्याची ओळख,‎ महिलांचे लैंगिक शोषण या विषयी‎ मार्गदर्शन केले. पोलिस निरीक्षक‎ राहुल खताळ यांनी महिलांची‎ गुलामी व नम्रता यावर माहिती दिली.‎ एम. जी. हिवराळे यांनी , महिलांना‎ खंबीर हाेण्याचा सल्ला दिला.‎

बातम्या आणखी आहेत...