आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:पोळ्यानिमित्त म्हसवे शाळेत चित्रकला स्पर्धा

पाराेळा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्हसवे माध्यमिक विद्यालयात बैल पोळ्यानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. विद्यार्थ्यांची सृजनशीलता तसेच कलात्मक दृष्टिकोन विकसित व्हावा, या उद्देशाने मुख्याध्यापिका सरिता देशमुख यांच्या अध्यक्षतेत विविध स्पर्धा घेण्यात आल्या. वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून मातीची बैलगाडी तयार करून घेतली.

तर चित्रकला, हस्तकला, मातीकाम अादी उपक्रम राबवण्यात आले. या कार्यक्रमास शिक्षक जितेंद्र पवार, शरद पाटील, विजय महाजन, शोभा बेहेरे, ललिता सूर्यवंशी, वैशाली पाटील, गोरख पाटील, उमाकांत बाविस्कर, विनोद पाटील यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...