आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:दूध संघाच्या जमिनीवर मंत्री महाजनांसह पॅनलचा डोळा ; आमदार खडसे यांची टीका

चोपडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मविप्र संस्था, चाळीसगाव एज्युकेशन संस्था, जामनेर शिक्षण संस्थेच्या जमिनी कोणी घशात घातल्या? हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. आता जिल्हा दूध संघाच्या जमिनीवर मंत्री गिरीश महाजन व त्यांच्या पॅनलचा डोळा आहे. ३० वर्षांपासून आमदार असलेल्या मंत्री महाजन यांनी दूध संघात एकदा तरी पाय ठेवला का? अशी टीका माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांनी चोपड्यात सहकार पॅनलच्या मेळाव्यात केली.अकुलखेडा येथे बुधवारी सकाळी झालेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी होते. माजी आमदार कैलास पाटील म्हणाले की, पाच वर्षे दूध संघ उत्तम चालला.

शिव्यांचे राजकारण दुर्दैवी
माजी मंत्री अरुण गुजराथी यांनी, जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत सुरू असलेले शिव्यांचे राजकारण अतिशय दुर्दैवी आहे. सात वर्षांत एकही साधी तक्रार दूध संघात नाही. एवढा चांगला कारभार झाला. आताच्या निवडणुकीत ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ होऊन जाऊ द्या असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...