आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक:पाचोऱ्यात पाणपोई सुरू; व्यावसायिकाचे औदार्य ; प्रभाकर राजपूत यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

पाचोरा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पोलिस ठाणे व भूमि अभिलेख कार्यालयाजवळ गणेश झेरॉक्सचे संचालक प्रभाकर राजपूत यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सर्वांसाठी मोफत पाणपोई सुरू केली आहे. दिवसभरातून १० ते १२ अक्वाचे जार ठेवून त्यांनी नागरिकांना शुद्ध व थंडगार पाण्याची सोय केली आहे.

गेल्या महिनाभरापासून अतिशय कडक उन्हाळा जाणवू लागल्याने परिसरात विविध कामांसाठी येणारे नागरिक थंडगार पाणी पिऊन समाधान व्यक्त करत राजपूत यांना धन्यवाद देत आहेत.

येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, पोलिस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, भूमि अभिलेख कार्यालय, सब रजिस्ट्रार आदी कार्यालयांमध्ये दिवसभरात शहरातील व ग्रामीण भागातील अनेक नागरिक आपल्या शासकीय व खासगी कामासाठी येत असतात. याच ठिकाणी १५ ते २० स्टॅम्प वेंडर व झेरॉक्स मशीनही आहेत. त्यामुळे या थंडगार पाण्याने अनेक नागरिकांची तहान भागत असून त्यांच्याकडून पाणपोई सुरू करून केलेल्या सोयीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...