आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुलांना मोबाइल फोन व इंटरनेट सुविधा उपलब्ध जरूर करून द्याव्यात. परंतु या सुविधेचा वापर मुले करत असताना पालकांनी त्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष सुद्धा देणे आवश्यक आहे. मुले जरी इंटरनेट सुविधा वापरत असली तरी त्यांचा वयानुसार आवश्यक गोष्टीच मुलांनी त्यावरून घ्यायला हव्यात. यासाठी पालकांचे त्यांच्याकडे बारकाईने लक्ष असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले. येथील ऑक्सफर्ड इंटरनॅशनल ड्रीम स्कूल मध्ये अँन्यूअल डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते उद्घाटन करताना बोलत होते.
अँन्यूअल डेच्या कार्यक्रमाला संस्था प्रमुख प्रमोद घोंगे पाटील, इंग्लिश स्कूल असोसिएशनचे भरत भांदर्गे, गजानन कळकुंबे, उत्तमराव घोंगे, अध्यक्षा प्रिया घोंगे, माजी सभापती रेणुका बुरकूल तसेच सत्कारमूर्ती आयपीएस अनिल म्हस्के यांचे आई-वडील लक्ष्मीबाई व रामदास म्हस्के, प्राचार्य विजय नागरे, आदर्श शिक्षक ज्ञानेश्वर झगरे, बोरकर, शरद घोंगे आदी मान्यवर उपस्थित होते. या अॅन्युअल डे च्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध नाट्य कलाविष्कार तसेच नृत्य गीते सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली.
या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेतून वर्षभरात घेतलेल्या विविध स्पर्धा मधील विजेत्यांना मेडल व ट्रॉफी देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उप प्राचार्या स्वाती भालेराव, लक्ष्मण खांडेभराड, रिता सुरोसे, वैशाली चेके, आकाश सद्गुले, तन्मया पुजारी, रवी खांडेभराड, पूजा भोपळे, प्रतीक्षा भुरावत, शुभांगी वायाळ, पूजा देशमाने या शिक्षकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.