आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतमोजणी:पारोळा पश्चिम सोसायटी; आज होणार मतमोजणी

पारोळा7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पारोळा पश्चिम सोसायटीसाठी ९५ टक्के मतदान झाल्याने त्याचा लाभ कोणाला होतो, हे आज होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होईल.एकूण १५८९ शिक्षक मतदार असलेल्या या संस्थेत मागील महिनाभरापासून विद्यमान प्रगती पॅनल आणि विरोधातील परिवर्तन पॅनलमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. संस्थेच्या इमारतीचा मुद्दा, कमी झालेले सदस्य, व्याजदर हे मुद्दे गाजले.

१५८९ मतदार असलेल्या संस्थेत एरंडोल येथे १८१ पैकी १५८, पारोळा २०५ पैकी २०३, चोपडा २९७ पैकी २७९, अमळनेर १८८ पैकी १७३, चाळीसगाव ४३० पैकी ४११ तर पाचोरा येथे २८८ पैकी २८३ असे एकूण १५०७ मतदान झाले. एकूण ११ पैकी ६ जागा जनरल, २ महिला, अनु.जाती एक, जमाती एक तर एन.टी.एक अशा जागा आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी विवेक जगताप आहेत. मतमोजणी आज बाजार समिती सभागृहात सकाळी ८ वाजता सुरू होईल.

बातम्या आणखी आहेत...