आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखान्देशसह राज्यातील युवा उद्योजक व चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बांधकाम समितीचे चेअरमन योगेश रमेशचंद्र अग्रवाल यांनी भारत व सौदी अरेबिया सरकारने संयुक्तरीत्या साैदी अरेबियात भरवलेल्या उद्योजक परिषदेत सहभाग घेतला होता.
ही परिषद १२ ते १६ जून दरम्यान सौदी अरेबियाची राजधानी रियादसह दमाम व जेता आदी प्रमुख शहरांमध्ये पार पडली. परिषदेला भारतातून जवळपास २० तर महाराष्ट्रातून एकमेव उद्योजक म्हणून योगेश अग्रवाल यांची निवड झाली होती. या परिषदेला सौदी अरेबियातील भारताचे राजदूत मोहम्मद शहीद आलम, हमना मरियम, शेख मोतासेम अबुझिनादह, प्रशांत सेठ आदींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, खान्देशातील उद्योगपती स्वर्गीय रमेशचंद्र मांगीलाल अग्रवाल हे योगेश अग्रवाल यांचे वडील. त्यांनी नेहमीच पंचक्रोशीतील बेरोजगार तरुणांना अधिकाधिक काम देण्यासाठी ठोस पावले उचलली. शेती आधारीत उत्पन्न वाढीसाठीही त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत केले हाेते. तोच वारसा योगेश अग्रवाल हे पुढे घेऊन जात असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शेती उत्पादनाला योग्य बाजारपेठ संदर्भात बैठक
या परिषदेत भारतातील शेती उत्पादनाला विशेष करुन फळपिकांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याबाबत सकारात्मक विचारमंथन झाले. यामुळे अगामी काळात सौदी अरेबियात केळी, द्राक्ष, पपई, डाळींब आदी फळे उत्पादनाची निर्यात वाढणार आहे. याचा थेट भारतातील फळबागधारक शेतकऱ्यांना लाभ होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.