आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिरवाईने फुलला परिसर:पाताेंडा विकास मंचने केले दीडशे वृक्षांचे संगाेपन ; गावातील तरुणांचे मिळतेय सहकार्य

पाताेंडा / प्रदीप पवार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील परिसर विकास मंचतर्फे ध्यान केंद्रात ३ ते ४ वर्षांपूर्वी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली होती. मंचच्या सदस्यांनी या झाडांचे उत्तम संगाेपन केल्याने हा परिसर आता हिरवाईने नटला आहे.पाताेंडा गावातील ध्यान केंद्र परिसरात पातोंडा परिसर विकास मंचच्या सदस्यांनी ३ ते ४ वर्षापूर्वी जवळपास दीडशे वृक्षांची लागवड केली हाेती. त्यानंतर या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी या सदस्यांनी पार पाडली. वृक्ष जगवण्यासाठी ध्यान केंद्रात कूपनलिका खोदण्यात आली.

या कूपनलिकेच्या माध्यमातून विकास मंचाच्या सदस्यांनी या वृक्षांना ठिबक संचाच्या सहाय्याने उन्हाळ्यासह सर्व ऋतुत पाणी दिले जात हाेते. तसेच वृक्षांवर रोगराई येवू नये, यासाठी कीटकनाशक फवारणी केली. दरम्यान, उन्हाळ्यात कूपनलिका बंद पडल्याने गावातील तरुण, तरुणींनी घरून बादलीत पाणी भरून वृक्षांना जीवनदान दिले हाेते. ध्यान केंद्र परिसरातील वृक्षांच्या ठिकाणी ट्रॅक्टरच्या साह्याने रोटा मारून गवत साफ करण्यात आले. तसेच मंचतर्फे गावात वृक्ष दिंडी काढून जनजागृती करण्यात आली. मंचतर्फे संपूर्ण गावात व गावाबाहेर वृक्ष लागवड करण्यात आली आहे. तसेच दरवर्षी जनजागृती करून वृक्ष लागवडीचा संदेश मंचकडून दिला जातो. मंचने येथे रिचार्ज शॉप्ट उपक्रम राबवला आहे.

विज्ञान केंद्र उभारले जाणार
विकास मंचतर्फे आगामी काळात श्री दत्त विद्या मंदिर शाळेत विज्ञान केंद्राची उभारणी केली जाणार आहे. यामुळे गावातील तरुणांना विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानासाेबत जोडून घेण्याच्या मंचच्या पदाधिकाऱ्यांचा मानस आहे. या संदर्भात ५ सप्टेंबर रोजी बैठक घेवून त्यात विज्ञान केंद्राची पुढील रूपरेषा ठरवली जाणार आहे.

अभ्यासिकेचा गावातील तरुणांना हाेताेय लाभ
ध्यान केंद्र परिसरात विकास मंचने अभ्यासिका सुरु केली असून गावातील तरुण, तरुणी या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. तसेच ध्यान केंद्रात पोलिस व सैन्य दलातील भरतीसाठी तरुण प्रॅक्टिस करतात. या तरुणांना विकास मंचतर्फे मार्गदर्शन केले जाते. अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षांचे विविध पुस्तके विकास मंचने उपलब्ध करून दिले आहेत. तसेच विविध विषयावर क्लास ही घेतले जातात. मंचतर्फे दर महिन्याला बैठका घेऊन सर्व कामांचा आढावा घेवून पुढील कामाचे नियोजन केले जाते.

बातम्या आणखी आहेत...