आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदासीनता:पारोळ्यात स्वच्छतेकडे लक्ष द्या, सहनशीलतेचा अंत पाहू नका ; अधिकाऱ्यांना सूचना

पारोळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाणी आणि स्वच्छता हे दोन्ही विषय शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. स्वच्छता हा पालिकेच्या हातातील विषय आहे. मात्र, याबाबत ही कमालीची उदासीनता दिसून येते. गटारी वेळेवर काढल्या जात नाहीत, काढलेला गाळ लवकर उचलला जात नाही. नाले सफाईसह विविध बाबत उदासीनता आहे. नागरिकांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका. कामात सुधारणा न झाल्यास कारवाई करू, असे संकेत आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक ज्योती भगत यांना दिले. पालिकेत आढावा बैठक घेण्यात आली, त्या वेळी आमदार चिमणराव पाटील अध्यक्षस्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर तहसीलदार अनिल गवांदे, मुख्याधिकारी तथा प्रशासक ज्योती भगत उपस्थित होते. आमदार पाटील म्हणाले की, पाणी आणि स्वच्छता हे दोन्ही विषय ज्वलंत आणि महत्वाचे आहेत. सध्या शहराला १२ ते १५ दिवसांत पाणीपुरवठा केला जात असल्याबद्दल आमदारांनी नाराजी व्यक्त केली. पाण्याचे दिवस कमी करण्यासाठी काय करावे लागेल? शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा सद्यस्थितीला कसा करता येईल? अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी असल्याचे या वेळी सांगण्यात आले. यावर पाणीपुरवठा अभियंता पंकज महाजन म्हणाले की, पाण्याची मागणी वाढल्यामुळे रोटेशन वाढते. परिणामी पाण्याचे दिवस वाढत जातात. २४ तासांपैकी २० तास पंप सुरु असतो, तेव्हा टाक्या भरतात.

अन्यथा कारवाई करणार... स्वच्छता महत्वाचा विषय असून पालिका तो सहज करू शकते. मात्र पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उदासीनतेमुळे गटारी वेळेवर काढल्या जात नाहीत. घंटागाडी येत नाही, नालेसफाई होत नाही. यासह विविध स्वच्छतेच्या विषयावर नाराजी व्यक्त करत यांच्यात सुधारणा न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा आमदार चिमणराव पाटील यांनी या वेळी दिला.

पाण्याच्या गुणवत्तेसाठी बोरी धरणाचा गाळ काढणे गरजेचे आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर आमदारांनी सार्वजनिक विहिरींसह बोरी धरणाचा गाळ काढण्यासाठी सीएसआरच्या निधीसाठी पाठपुरावा, करू असे स्पष्ट केले. या वेळी आरोग्य विभागात प्रचंड तक्रारी असल्याचे आमदारांनी सांगून स्वच्छता मोहीम राबवा, गटारी, नाले सफाईवर भर द्या. कामचुकारपणा झाल्यास कारवाई करण्याचा सज्जड दम भरला.

बातम्या आणखी आहेत...