आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी आमदार शिरीष चौधरी यांनी घेतली भेट:अतिवृष्टीच्या भरपाईसाठी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे

पाडळसरे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सण २०१९ मधील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तीन वर्षे लोटली तरी नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे भरपाई त्वरीत मिळावी, अशी मागणी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पत्राव्दारे केली.२०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यातील ५२ पैकी २० गावांना शासकीय नुकसान भरपाई मिळाली. मात्र अद्याप ३२ गावातील शेतकऱ्यांना ३५ कोटी ४० लाखांची भरपाई मिळालेली नाही. यासंदर्भात तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही दखल घेतली गेली नाही. जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीतील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना, भरपाई देण्याचे आदेश १५ जुलै २०२२ रोजी काढण्यात आले. मात्र अजूनही जून ते ऑक्टोबर २०१९ मधील अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. या पाश्वभूमीवर भरपाई देण्यात यावी अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत माजी आमदार चौधरी यांनी भरपाई द्यावी अशी मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...