आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणुकीला गालबोट:धानोऱ्यात 20 वर्षांनी पुन्हा शांतता भंग; यापूर्वी 2002 मध्ये झाली मिरवणुकीत दगडफेक

धानोरा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश विसर्जन मिरवणुकीत ४ रोजी पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर पोलिसांवर दगडफेक झाली. गोंधळामुळे विसर्जन खोळंबलेल्या मंडळांनी ५ रोजी सकाळी विसर्जन केले. यापुर्वी १४ सप्टेंबर २००२ रोजी गणपती विसर्जन मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी तुफान दगडफेक करुन दंगल घडवली होती. यानंतर २० वर्षांनी रविवारी रात्रीही विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले.

रात्री दहा वाजता पोलिसांनी वाजंत्री बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर, काही मंडळांनी हनुमान मंदिर चौकात ठिय्या मांडला. यामुळे पोलिसांनी लाठीमार केल्याने १० ते १२ जण किरकोळ जखमी झाले. त्यानंतर पोलिसांवर दगडफेक झाल्याने काही पोलिस जखमी झाले. सहायक पोलिस निरीक्षक दांडगे यांच्या निलंबनाची मागणी करत ३०० ते ४०० ग्रामस्थांनी चौकात रात्री ११ ते पहाटे ३ या वेळेत ठिय्या मांडला. सकाळी ६ वाजता उर्वरित मंडळांनी विसर्जन केले. घटनेनंतर जबाबदार अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी गावाला भेट न दिल्यामुळे नाराजी व्यक्त झाली. शांतता कमिटीच्या बैठकीत रात्री अकरापर्यंत विसर्जन मिरवणुकीत वाजंत्री सुरु राहील असे पोलिसांनी सांगितले होते. पण दहा वाजताच वाजंत्री बंद करण्यास सांगितले. वाजंत्री सुरु ठेवली असती तर वेळेत मिरवणूक आटोपली असती, असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
धानोरा येथे झालेल्या लाठीमाराचा निषेध म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ जळगाव, सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...