आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील शिक्षकांना भेट दिली लेखणी

चाळीसगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन साजरा केला. प्राचार्य अजय घोरपडे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना स्वतः बनवलेले शुभेच्छापत्र व गुलाब पुष्प देऊन त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून प्रत्येक वर्गात अध्यापन केले.

शिक्षक दिनाचे हेच औचित्य साधून खासदार उन्मेष पाटील व उमंग समाज शिल्पी संस्थेच्या अध्यक्षा संपदा पाटील यांनी शिक्षकांची शस्त्र म्हणजेच लेखणी होय, हे सांगून प्रत्येक शिक्षकाला लेखणी भेट दिली. विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी मैदानी खेळ आयोजित केले होते. या खेळात सर्व शिक्षकांनी सहभाग नोंदवत प्रतिसाद दिला.

बातम्या आणखी आहेत...