आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील हिंगणे बुद्रूक येथील माजी सरपंच अनिल चौधरी यांच्यावर दोन संशयितांनी पिस्तुल रोखल्याचा प्रकार, मंगळवारी सायंकाळी सहा वाजेदरम्यान घडला. या घटनेनंतर अडीच तास ऊलटूनही पोलिस न आल्याने संशयितांच्या अटकेसाठी ग्रामस्थांनी जामनेर पोलिस ठाण्यासमोर रात्री ठिय्या आंदोलन केले. संशयितांनी हवेत गोळी झाडल्याचेही चौधरी यांनी सांगितले.
हिंगणे बुद्रूक ग्रा.पं.निवडणुकीचा वाद विकोपाला गेला. माजी सरपंच तथा पॅनल प्रमुख अनिल चौधरी हे नेहमीप्रमाणे सायंकाळी शेतातील मजुरांना नेरी येथे सोडून वाहनाने घराकडे निघाले होते. त्याचवेळी गावातील ज्ञानेश्वर पंडीत गोसावी याने फोन करून त्यांना गावाजवळ थांबवले. नंतर ज्ञानेश्वर गोसावी व तुषार गोसावी हे दुचाकीने आले.
चौधरी यांना बोलण्याच्या बहाण्याने शेतात नेले. एक गोळी हवेत झाडून ज्ञानेश्वर गोसावी याने पिस्तूल त्यांच्या डोक्याला लावले. हा प्रकार लक्षात येताच कार्यकर्त्यांनी चौधरी यांच्याकडे धाव घेतल्याने अनर्थ टळला. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिस ठाण्यात सुरू होते.
सहकारी धावून आल्यामुळे थोडक्यात बचावलो
नेरी येथून गावी परतत होतो. त्यावेळी ज्ञानेश्वर गोसावी याचा फोन आल्याने गावाजवळ थांबलो. त्यावेळी ज्ञानेश्वर व तुषार हे आले. मला एकट्याला शेतात बोलावून ‘तुला मारून टाकले तर तुझ्या पॅनलचे काय होईल’ असे उद्गार काढून एक गोळी हवेत झाडली, तसेच कानशिलावर पिस्तूल ठेवत पैशांची मागणी केली. सहकारी धावून आल्याने बचावलो, असे अनिल चौधरी यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.