आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागावठी पिस्तुल विक्रीचा प्रकार चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी हाणून पाडला. वाघळी येथे अवैध पिस्तुल बाळगणाऱ्या युवकाला ताब्यात घेत, पोलिसांनी सोमवारी दुपारी २५ हजार रूपये किंमतीच्या गावठी कट्ट्यासह १५०० रूपयांची तीन जिवंंत काडतुसे जप्त केली. संशयिताने हे पिस्तुल विक्रीसाठी आणल्याची माहिती समोर आली.
वाघळी येथे चांभार्डी रस्त्यालगत बेघर वस्तीमध्ये राहणारा संशयित आकाश अमृत शिरसाठ (वय २५) याच्याकडे गावठी पिस्तुल असल्याची माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक लोकेश पवार यांना मिळाली होती. त्यावरून त्यांच्यासह पोलिस नाईक गोवर्धन बोरसे, नितीन आमोदकर, शांताराम पवार, हवालदार दत्तात्रय महाजन, जयवंत सपकाळे यांच्या पथकाने सोमवारी दुपारी ३ वाजता वाघळीतील बेघर वस्तीत कारवाई केली. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत शस्त्र अधिनियम १९५९चे कलम ३/२५, ७/२५ सह, महाराष्ट्र पोलिस अधिनियम ३७(१)(३)चे उल्लंघन केल्याने कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला.
कमरेला लावले होते पिस्तूल
पोलिस पथकाने आपले वाहन काही अंतरावर उभे करून पायीच संशयिताचे घर गाठले. ओट्यावर संशयित आकाश शिरसाठ बसलेला दिसला. मात्र पोलिस आल्याचा सुगावा लागताच तो पळू लागला. त्याचवेळी पथकाने पाठलाग करून त्याला पकडले. अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी पिस्तुल लावलेले दिसले. या पिस्तुलला एक मॅगझीन होती, त्यात तीन जीवंत काडतुसे होती. हे पिस्तुल विक्रीसाठी आणल्याची कबुली संशयिताने दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.