आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लागवड:सामाजिक संस्थांकडून 2 वर्षांत 4 हजार रोपांची लागवड ; पर्यावरण संवर्धनास मदत मिळणार

भडगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भडगाव शहरासह तालुक्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक व इतर संस्थांच्या माध्यमातून जवळपास चार हजारापेक्षा जास्त रोपांची तालुक्यात लागवड करण्यात आली आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनास मदत मिळणार आहे. या उपक्रमात सहभागी संघटनांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मात्र या झाडांची हानी होताना दिसून येत आहे. दरवर्षी पावसाळ्यात शासन तसेच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ठिकठिकाणी वृक्षारोपण केले जाते. अनेकवेळा रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड केली जाते. रस्त्याने जाणाऱ्या वाटसरूंना झाडाची शीतल छाया मिळावी, तसेच पर्यावरणाचे संतुलन राखावे, शेतातील मृदेचे संवर्धन व्हावे, यासाठी या वृक्षांची लागवड केली जाते. त्यांची वर्षभर देखभाल ही केली जाते. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षापासून तालुक्यात उन्हाळ्याच्या शेवटी अनेक शेतकऱ्यांकडून रस्त्याच्या दुतर्फा असणारे बांध जाळले जात आहेत. यातून लागणाऱ्या आगीच्या भक्ष्यस्थानी वृक्षारोपणाच्या माध्यमातून लावलेली छोटी-छोटी रोपे येत आहेत. अशा शेतकऱ्यांकडून होणारे वृक्षांचे नुकसान वेदनादायी आहे, अशी प्रतिक्रिया वृक्षप्रेमी नागरिक व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांनी हा प्रकार थांबवावा व वृक्ष संवर्धनाच्या कामी सहकार्य करावे, असे आवाहन वृक्ष प्रेमींकडून केले जात आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी बांधावरील कचरा जाळताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

भडगाव तालुक्यात काही शेतकऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाडांची होतेय हानी

वन विभागाचे दुर्लक्ष तालुक्यात वृक्ष लागवडीच्या तुलनेत वृक्षतोड अधिक आहे. शहरात नाचणखेडा रोड, बाळद रोड, कोटली, वाक, जुना वाक, पेठ, भवानी बाग समोर, पाचोरा रोड, स्मशान भूमीजवळ, चाळीसगाव रोड या भागात ओल्या वृक्षांची कत्तल करुन वाहतूक होते. मात्र, वन विभागाचे याकडे दुर्लक्ष होते.

जून, जुलैमध्ये संकल्प जून व जुलैमध्ये अधिक वृक्षरोपणाचा संकल्प घेण्याचे आवाहन विविध सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. आगामी पावसाळ्यात वृक्षारोपण मोठ्या संख्येने होणार आहे, त्यात नागरिकांनी मोठा वाटा उचलून सहभागी व्हावे, असे आवाहन केले जात आहे. वृक्षारोपण व संवर्धनात अग्रेसर सामाजिक संस्था सामाजिक वनीकरणासह तालुक्यात वृक्षारोपण व संवर्धनात भडगाव नगर परिषद, माऊली फाउंडेशन, डॉ. संजीव पाटील युवा फाउंडेशन, अंचळगाव, श्री समर्थ बैठक सेवेकरी, जागृती मित्र मंडळ, स्वामी समर्थ केंद्र, राजा शिवछत्रपती बहूउद्देशिय संस्था, किसान शिक्षण संस्था, र. ना. देशमुख महाविद्यालय, शहरातील विविध शैक्षणिक संस्था, आमडदे, वडजी व जुवार्डी येथील युवा मंडळ आदी संस्थांनी सामाजिक योगदानातून दोन वर्षात तालुक्यात ४ हजार पेक्षा जास्त रोपे लावली आहे.

बातम्या आणखी आहेत...