आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी वसुंधरा अभियान:पारोळा पालिकेतर्फे 10 हरित क्षेत्रात‎ 10 हजारांपेक्षा जास्त वृक्षांची लागवड‎, दोन हजार वृक्षांचे वितरण; शहरात 187 झाडे हेरिटेज- ट्री‎

पारोळा‎4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझी वसुंधरा अभियानांतर्गत पारोळा‎ नगर परिषदेतर्फे शहरात विविध उपक्रम‎ राबवले जात आहेत. यात शहरात १०‎ हजारांपेक्षा जास्त वृक्षांची लागवड करुन‎ १० हरित क्षेत्र निर्माण करण्यात आले‎ आहेत.‎ याबाबत मुख्याधिकारी ज्योती भगत‎ यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की,‎ पारोळा नगर परिषदेतर्फे माझी वसुंधरा‎ अभियान अंतर्गत पृथ्वी या घटकात हरित‎ आच्छादन वाढवण्यासाठी अभियान सुरु‎ झाल्यापासून शहरात १० हजारांपेक्षा‎ जास्त वृक्षांची लागवड करून १० हरित‎ क्षेत्र निर्माण करण्यात आली आहेत. तर २‎ हजार पेक्षा जास्त वृक्षांचे वाटप करण्यात‎ आले आहे. त्यात प्रामुख्याने वड, पिंपळ,‎ निंब, चिंच यासारख्या भारतीय प्रजातींची‎ ६ ते ८ फुट उंची असलेली झाडे‎ लावण्यात आली आहेत. तर त्यांच्या‎ संगोपनाचे व संवर्धन काम सुरु आहे.‎ शहरात रस्त्याच्या कडेला लहान फुलांची‎ झाडे लावून हरित पट्टे विकसित करण्यात‎ आले आहेत. पारोळा पालिकेच्या हद्दीत‎ हेरिटेज-ट्री गणना झाली असून शहरात‎ १८७ झाडे हेरीटेज-ट्री अंतर्गत निश्चित‎ करण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने‎ वड, पिंपळ, उंबर, चिंच या झाडांचा‎ समावेश आहे.‎

इलेक्ट्रिक वाहनांचा‎ वापर करण्यास प्रोत्साहन‎
अभियानातील वायू या घटकात‎ पर्यावरणपूरक वाहनांचा म्हणजेच‎ इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा‎ म्हणून नगर परिषदेतर्फे नागरिकांना‎ प्रोत्साहित केले जात आहे. तसेच जे‎ नागरिक इलेक्ट्रिक वाहनाचा वापर‎ करतात. त्यांची नावे सोशल‎ मीडियावर प्रसिद्ध करण्यात येत‎ आहे.‎

झाडांना दिले जाते तयार‎ केलेले कंपोस्ट खत ...‎ जैव विविधता नोंद वही तयार झाली‎ असून नागपूर येथील महाराष्ट्र राज्य‎ जैवविविधता मंडळाकडे ती‎ पाठवण्यात आली आहे. शहरात‎ निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर‎ प्रक्रिया करून त्याचे कंपोस्ट खत‎ तयार करण्यात येत आहे. या निर्माण‎ झालेल्या कंपोस्ट खताचा वापर‎ शहरात लावलेल्या झाडांना केला‎ जातो. हे निर्मित कंपोस्ट खत हरित‎ ब्रँड मिळवण्याकरता तपासणीसाठी‎ राहुरी येथील कृषी विद्यापीठात‎ पाठवले आहेत. या अभियानाचे‎ सर्वत्र कौतुक होत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...