आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लागवड:चाळीसगाव न्यायालय आवारात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड ; कार्यक्रमाचे आयोजन

चाळीसगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त येथील दिवाणी न्यायालयाच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विविध प्रजातीच्या १० झाडांची रोपे लावण्यात आली. या कार्यक्रमास तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश एन.के. वाळके, सह दिवाणी न्यायाधीश एस.डी. यादव, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश एस.आर. शिंदे, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश ए.एच. शेख, तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड.भागवत पाटील, अॅड.एस.जी. सोनार, अॅड.मयुर कुमावत, अॅड.वर्षा देवरे, सदस्य अॅड.एस.टी. खैरनार, अॅड.एस.व्ही. नानकर, अॅड.डी.एस. निकम, अॅड.संतोष पाटील, तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...