आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:पोदार स्कूलने पटकावलास्वच्छ विद्यालय पुरस्कार; शाळेत स्वच्छतेचे विविध उपक्रम

चाळीसगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे दला जाणारा, जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलने पटकावला आहे. नुकताच मुख्याध्यापिका लता उपाध्याय यांना हा पुरस्कार जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमास आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी अभिजित राउत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया आदींची उपस्थिती होती. पोदार इंटरनॅशनल स्कूल नेहमीच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शालेय परिसर स्वच्छतेला महत्व देत आले आहे. जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार देवून गौरविण्यात आल्याने मुख्याध्यापिका लता उपाध्याय यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आगामी काळातही शाळेत स्वच्छतेचे विविध उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...