आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातृ-महिमा नावाचा काव्यसंग्रह:शेगावात काव्य संमेलन; मालपुरे यांची निवड

चाळीसगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेगाव येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय रचियेता काव्य संमेलनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून चाळीसगाव येथील साहित्यिक बी. एम. मालपुरे यांची नियुक्ती झाली आहे.

बाळकृष्ण महादू मालपुरे हे करगाव येथील माध्यमिक आश्रम शाळेत ज्येष्ठ शिक्षक आहेत. आईच्या स्मृती प्रीत्यर्थ त्यांनी मातृ-महिमा नावाचा काव्यसंग्रह काढून समाजात एक वेगळा उपक्रम केला होता. संवेदना फाउंडेशनच्या माध्यमातून ते पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करतात. ते वाणी युवा मंचचे चाळीसगाव तालुकाध्यक्ष आहेत. या निवडीबद्दल बी. एम. मालपुरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...