आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कवींनी समष्टीचा विचार करून साहित्य परंपरा विस्तारावी; औरंगाबादचे ज्येष्ठ समीक्षक प्रा.डॉ. सतीश बडवे यांचे प्रतिपादन

पाचोरा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्याला स्वतःच्या काळाचे भान असते, अशा कवींनी समष्टीचा विचार करून साहित्याची परंपरा तळागाळापर्यंत पोहोचवली पाहिजे, असे मत प्रा.डॉ.सतीश बडवे यांनी केले.

पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पाचोरा शाखा आणि जळगाव येथील प्राचार्य डॉ. किसन पाटील ज्ञान-परंपरा यांच्या संयुक्त विद्यमाने १२ रोजी प्राचार्य डॉ. किसन पाटील वाङ्मय पुरस्काराचे वितरण पाचोरा येथील शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात झाले, त्या वेळी डाॅ. बडवे बाेलत हाेते. अध्यक्षस्थानी व्ही. टी. जोशी होते. माजी प्राचार्य डॉ. भी. ना. पाटील, अशोक महाजन, उज्ज्वला महाजन, डॉ. योगेश महाले, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. पी. एम. डोंगरे, प्रा. के. एस. इंगळे, प्रा. वाय. बी. पुरी, प्रा. आर. बी. वळवी, डॉ. क्रांती सोनवणे उपस्थित होते.

डाॅ. किसन पाटलांनी कर्तृत्वाने खान्देशात मसाप वाढवली
डॉ. अशोक कोळी म्हणाले की, डॉ. किसन पाटील यांनी आपले आयुष्य शैक्षणिक व सामाजिक कार्यास वाहून घेतले. म्हणूनच तर खान्देशात साहित्यिकांची नवीन पिढी घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. गुरुवर्य डॉ. किसन पाटील यांचे शैक्षणिक, साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने खान्देशात मसाप वाढवली. म्हणूनच डॉ. किसन पाटील व महाराष्ट्र साहित्य परिषद हे एक अनुबंध खान्देशात तयार झाले, असे विचार कार्याध्यक्ष प्रा.डॉ. वासुदेव वले यांनी प्रास्ताविकात प्रकट केले.

बातम्या आणखी आहेत...