आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारस्त्याच्या कामावरून १४ लाखांचे पोकलँड मशीन लंपास करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीचा १९ लाखांचा मुद्देमाल जप्त केले. पोकलँड मशीन चोरट्याने भंगार व्यावसायिकाला विकले होते. त्या व्यावसायिकालाही पोलिसांनी अटक केली आहे.
पोकलँड मशीन मालक राज पाटील यांनी अमळनेर पोलिसांत २९ जुलैला याबाबत फिर्याद दिली होती. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी तीन दिवसात गुन्ह्याचा यशस्वी तपास केला. हे मशीन हे नवनीत देवाजी पाटील (रा.बाभूळगाव, ता.शिंदखेडा) याने चोरून नेल्याचे समोर आले. पोलिसांनी ३० जुलैला त्याला ताब्यात घेतले होते. अमळनेर न्यायालयाने त्यास तीन दिवसांची कोठडी सुनावली होती. संशयिताने धुळे येथील भंगार व्यावसायिक हजरतउल्ला उर्फ राजू रहेमतउल्ला खान (रा. चाळीसगावरोड, धुळे) याच्याशी संगनमत करून, २५ जुलैला सायंकाळी विकले होते. तसेच पोकलॅँडचे सुटे भाग करून ते विक्रीसाठी ठेवले होते.
पोलिसांनी भंगार दुकानावर छापा टाकला असता, चोरीला गेलेल्या मशीनचे सर्व सुटे भाग तोडून ते (एम.एच.४६-ए.आर.७६८६) या ट्रक मध्ये ठेवलेले आढळले. पोलिस पथकाने चोरीला गेलेले पोकलँड मशीनचे सुमारे तीन लाख रुपये किमतीचे स्पेअर पार्ट, १० लाख रुपये किमतीचा ट्रॅक, सहा लाख रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली इंडिगो कार (एमएच- ३९, डी- २७९६) असा १९ लाखांचा मुद्देमाल जप्त करुन, दोघांना अटक केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.