आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत (पोकरा) टप्पा क्रमांक दोनमध्ये एरंडोल, पारोळा आणि भडगाव तालुक्यातील उर्वरित गावांचा समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी पोकरा टप्पा क्रमांक दोनला मंजुरी दिली. मराठवाडा, विदर्भासह जळगाव जिल्ह्यातील उर्वरित गावांचा या योजनेत समावेश करण्यात येणार आहे. या योजनेसाठी सहा हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा लाभ होतो. योजनेत ठिबकसाठी अनुदान मिळते. टप्पा क्रमांक एकमधील अनेक लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत हे अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे अनुदान त्वरित देण्यात यावे अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.
योजनेत जिल्ह्यातील सुमारे ८०० गावांचा समावेश करून, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. एरंडोल व पारोळा हे दोन्ही तालुके अवर्षण प्रवण आहेत. जिल्ह्यातील उर्वरित ५ हजार २२० गावांचाही या योजनेत समावेश करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. या योजनेबाबत जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होऊन चर्चा करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.