आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात कित्येक वर्षांपासून मुख्य रस्त्यांवर रहदारीचा मोठी समस्या निर्माण झाली आहे. या समस्येचा अनेकांना त्रास सहन करावा लागतो. दरम्यान, नुकतेच चोपडा शहर पोलिस ठाण्यात चाळीसगाव येथून बदली होऊन आलेल्या पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी पदभार घेतला. त्यानंतर चोपडा शहरात मुख्य रस्त्यांवर मोठा बदल दिसून येत आहे. पाेलिस निरीक्षक पाटील यांनी पदभार घेताच चोपडा शहरातील काेणत्याच रस्त्यावर हातगाडी दिसत नाही. चोपडा शहरातील मुख्य रस्त्यावर हातगाडी धारकांनी जे अतिक्रमण केले होते, त्यावर आतापर्यंत कुणीही बोलायला तयार नव्हते.
मात्र, तीन दिवसापासून चोपडा शहरातील मुख्य रस्त्यावर मोठा बदल दिसत आहे. चोपडा शहरातील व तालुक्यातील जनतेने पायी चालताना हा अनुभव जाणवला आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी दोन दिवसापूर्वी चोपडा शहर पोलिस ठाण्यात सर्व हात गाडीधारकांची, लहान-मोठे व्यावसायिकांची बैठक बोलून त्यांना रस्त्यावर वाहने न लावणे संदर्भात स्पष्टपणे ताकीद दिली आहे. यामुळे रत्नावती नदीवरील दोन्ही पूल आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेन रोड, बाजार पेठ, हॉटेल सुयोगकडे जाणाऱ्या रस्त्यावर बदल झाला आहे.
जेथे दुचाकी चालवताना कसरत करावी लागत होती, तेथे आता चारचाकी गाडी सहज फिरू शकते, असे रस्ते मोकळे झालेले आहेत. दोन दिवसांपासून मुख्य रस्त्यावर कुठेही हात गाडी न दिसल्याने चोपडा शहराने मोकळा श्वास घेतल्याची भावना सामान्यांनी व्यक्त केली आहे. याबद्दल के. के. पाटील यांनी अनेकांनी कौतुक केले आहे. ही कारवाई कायमस्वरूपी व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.