आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भटकंती:पोलिस भरतीचे संकेतस्थळ चालेना, उरले सहाच दिवस

अमळनेर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस दलातील शिपाई व चालकांची २१ हजार ७६४ पदे भरण्यासाठी ९ नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र त्यासाठी सुरू करण्यात आलेले policerecruitment2022.mahait.org हे संकेतस्थळच चालत नसल्याने युवकांचे हाल होत आहेत. परिणामी ग्रामीण भागातील युवकांना भटकंती करावी लागत आहे. अर्जासाठी ३० नोव्हेंबरची मुदत आहे, अवघे सहा दिवस उरल्याने युवकांची घालमेल होत आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ग्रामीण भागातील युवकांना दररोज शहरातील सायबर कॅफेवर जावे लागते. सकाळपासूनच त्यासाठी युवकांची भटकंती सुरु होते. ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा ग्रामीण भागात अद्याप काही ठिकाणी उपलब्ध नाही. तसेच काही ठिकाणी असल्यास अनेक ठिकाणी कित्येक तास विज नसते. त्यातच शहरात येऊनही सर्व्हर डाऊनची समस्या येत असल्याने गैरसोय वाढली.

कॅफेचालकांनाही मनस्ताप ^वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने सायबर कॅफेचालकांनाही त्याचा फटका बसतो. अनेकदा उमेदवाराची ऑनलाइन माहिती निम्मे भरल्यावरही सर्व्हर अचानक डाऊन होते. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. विजय पाटील, सायबर कॅफेचालक

बातम्या आणखी आहेत...