आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भवितव्य ईव्हीएमबंद:कजगावात वादामुळे 15 मिनिटे मतदान बंद

कजगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या कजगाव ग्रामपंचायतीच्या १८ सदस्यांचे भवितव्य ईव्हीएमबंद झाले. एकूण ३६ उमेदवार रिंगणात आहेत. तर लोकनियुक्त सरपंच पदासाठी चार उमेदवार आहेत. रविवारी दुपारी मतदान सुरु असताना किरकोळ वाद झाल्याने १५ मिनिटे मतदान प्रक्रिया बंद झाली होती. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंत पुन्हा प्रक्रिया सुरळीत झाली. कजगाव येथे एकूण ४७२१ म्हणजे ७७.९१ टक्के मतदान झाले.

ग्रामपंचायत सदस्यांची एक जागा यापुर्वीच बिनविरोध झाली आहे. सकाळपासून जि.प.शाळेतील मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. मतदान प्रक्रियेत तरुणांचा विशेष उत्साह होता. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनीही हक्क बजावला. दिव्यांग आणि ज्येष्ठांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी उमेदवारांनी वाहनांची व्यवस्था केली होती.

दुपारी मतदान सुरू असताना किरकोळ वाद झाल्याने, १५ मिनिटे मतदान बंद करण्यात आले होते. पोलिसांनी वेळीच गर्दीवर नियंत्रण मिळवल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत झाली. गावातील एका नवदांपत्यानेही लग्न लागल्यानंतर मतदान केले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, भडगावचे पोलिस निरीक्षक अशोक उतेकर, उपनिरीक्षक वाघमारे हजर होते.

बातम्या आणखी आहेत...