आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार सेवा केंद्रात स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. या वेळी भाविकांसह सेवेकऱ्यांची मोठी उपस्थिती हाेती. प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या घरून भोजनाचा डबा आणला होता.
हे सर्व अन्न एकत्र करून महाराजांना नैवेद्य दाखवण्यात आला. तालुक्यातील सर्व साप्ताहिक सेवा व बाल संस्कार केंद्रांनी या उपक्रमात सहभाग घेऊन महाराजांची सेवा केली. सर्वच महिला व पुरुष सेवेकऱ्यांनी श्री दुर्गा शप्तशती व श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे सामूहिक वाचन अन् पारायण केले.
सकाळी ११ वाजता आयकर विभागाचे सहआयुक्त विशाल मकवाने यांच्या हस्ते नैवेद्य महाआरती करण्यात आली. केंद्रप्रमुख राकेश मकवाने, आयकर विभागाचे सहआयुक्त विशाल मकवाने यांनी सर्व सेवेकऱ्यांना श्री स्वामी समर्थ यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. या उत्सवासाठी सर्व सेवेकऱ्यांनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.