आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात नवोदय विद्यालयाच्या तोडीच्या सेवा सुविधा असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक भवनही विद्यार्थ्यांसाठी आसुसलेले होते. विद्यार्थ्यांमध्ये अधिकाधिक शाळेची ओढ आणि आस्था निर्माण व्हावी या हेतूने शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी पालक आणि विद्यार्थ्यांचे पुस्तके देत स्वागत झाले. ही शाळा पुन्हा येथे सुरु व्हावी, यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. आज हा प्रयत्न सफल झाल्याचे समाधान असून अनुसूचित आणि नवबौद्ध समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधायुक्त शिक्षण मिळणार असल्याने त्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन खासदार उन्मेष पाटील यांनी येथे केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संचालित आयएसओ मानांकित शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना पालकासोबत पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला. त्यावेळी खासदार पाटील बोलत होते. पहिल्या दिवशी या प्रवेशोत्सवाकरिता सुंदर रंगरांगोळी, भव्य आकर्षक मंडपाची उभारणी करुन सुशोभिकरण करण्यात आले होते. या प्रसंगी समाज कल्याण विभागाच्या लेखा अधिकारी मनिषा पाटील, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सावळे, उपक्रमशील शिक्षक ध्रुवास राठोड व शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांसह पालकांचाही खासदार पाटील यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. भविष्याची दिशा कशी असावी, याविषयी विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षा राजपत्रित लेखा अधिकारी मनिषा पाटील यांनी, त्यांचा यशस्वी जीवनप्रवास उलगडत स्फूर्तिदायी मनोगत व्यक्त केले. आपल्या शैक्षणिक कार्य कर्तृत्वाने राज्यभर नावलौकिक झालेले उपक्रमशील शिक्षक ध्रुवास राठोड यांनी शाळेत राबवले जाणारे विविध नावीन्यपूर्ण गुणवत्तादायी उपक्रम व विद्यार्थ्यांना शाळेमार्फत मिळणाऱ्या सोयी सुविधांची माहिती देत शाखेकरिता खासदार पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांचा प्रवास सांगितला. आभार मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सावळे यांनी मानले.
पालकांकडून आभार व्यक्त
अमरावती येथे स्थलांतरित झालेली शाळा पुन्हा येथे मिळवून जागा उपलब्ध करुन आज ही दिमाखदार शाळा प्रत्यक्षात साकारली.पाल्यांना सुविधायुक्त शाळा उपलब्ध केल्याबद्दल पालकांनी खासदार पाटील यांचे आभार व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.