आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्याची दूरवस्था:धुळे ते सोलापूर राज्य महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले

चाळीसगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोढरे फाटा ते धुळे या राष्ट्रीय महामार्ग २११च्या चौपदरीकरण कामाला सुरूवात झाली आहे. या महामार्गाचे चौपदरीकरण होणार असले तरी सध्य-स्थितीत जो दुपदरी रस्ता आहे, त्यावर ही जीवघेणे खड्डे पडले आहेत. विशेषतः दहिवद फाटा ते चाळीसगाव या रस्त्याची दूरवस्था झाली आहे.

उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या चार वर्षापासून रखडले होते. कन्नड ते थेट सोलापूरपर्यंत या मार्गाचे भाग्य उजळले आहे. मात्र, कन्नड पायथ्यापासून बोढरे फाटा ते धुळे चौकापर्यंतचे कामच रखडले. या रस्त्यावरून रात्रंदिवस हजारो वाहने धावत असतात. मात्र, महामार्गाच्या गेल्या ४ ते ५ वर्षांतील अवस्थेमुळे शेकडो अपघात होवून मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. आता या महामार्गाचे धुळे ते बोढरे फाटा यादरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. दहिवद फाटा ते चाळीसगाव रस्त्यावर पाऊस पडला तर खड्डा दिसत नाही आणि पाऊस नसला तर धुळीमुळे रस्ता दिसत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे अपघातांची मालिका सुरुच आहे.

चार महिन्यांपूर्वी झाली हाेती डागडुजी ...
या रस्त्याची ४ ते ५ महिन्यांपूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून डागडुजी करण्यात आली होती. मात्र, त्या डागडुजीचा काहिही लाभ झाला नाही, असे नागरिक तसेच वाहनधारकांचे म्हणणे आहे. जे खड्डे बुजवले त्या खड्ड्यात भरलेला डांबर बाहेर येत असल्याचे सांगितले जाते. जोपर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा रस्ता चालण्या-लायक करावा, अशी अपेक्षा वाहन धारकांकडून केली जात आहे. या गंभीर आणि महत्वाच्या प्रश्नाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ही मूग गिळून गप्प बसल्याचे दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...