आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील मंगरूळ येथे तब्बल ३५ वर्षानंतर विविध कार्यकारी सोसायटीत सत्ता परिवर्तन झाले. परिवर्तन पॅनलने १३ पैकी ११ जागांवर विजय मिळवला आहे. तर सत्ताधारी शनैश्वर पॅनलला केवळ दोन जागा मिळाल्या. श्रीकांत पाटील व भगवान पाटील यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलने ३५ वर्षांनंतर विकासोच्या राजकारणाला कलाटणी दिली. परिवर्तन पॅनलचे सर्वसाधारण जागेवरील उमेदवार विनोद भगवान पाटील (३१५), अरुण विश्वास पाटील (३०५), जयप्रकाश रामदास पाटील (३०१), राजेंद्र श्रीराम पाटील (२९४), कैलास तुकाराम पाटील (२८२), रणछोड झांबर पाटील (२८२), महिला मतदार संघात मंगलाबाई भास्कर पाटील (३७७), सिंधुबाई गुलाब पाटील(३०१), अनुसूचित जाती जमाती मतदार संघात अरुण नामदेव घोलप (३१७), नामाप्र संवर्गात विश्वास अभिमन पाटील (३२९), भटक्या विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्गात दिलीप नामदेव गढरी(३५३) यांनी विजय मिळवला. परिवर्तन पॅनलच्या विजयात दीपक बागुल, राकेश पाटील, जे.व्ही.बागुल, बापू पाटील यांचे सहकार्य लाभले. प्रतिस्पर्धी पॅनलचे भाईदास नवल पाटील (३०५) व अनिल प्रकाश पाटील (२८७) हे २ उमेदवार विजयी झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.