आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराला गुरूवारी सायकांळी झालेल्या जोरदार वादळी पावसाने जबर तडाखा बसला. शहरात ठिकठिकाणी मोठे वृक्ष उन्मळून पडल्याने घरांसह दुचाकी, कार व छोट्या दुकानांचे मोठे नुकसान झाले. शहरातील अनेक भागात विजेचे खांब वाकल्याने तसेच तारा तुटल्याने बहुतांश भागाचा विज पुरवठा विस्कळीत झाला. स्टेशनरोड, गणेशरोड अशा मुख्य रस्त्यावर झाडे कोसळून आडवी झाल्याने शहरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. चाळीसगावात पहिल्यांदाच एवढे नुकसान झाले. दरम्यान गेल्या वर्षी पावसाळ्यात शहरातील नद्यांना सात पूर आल्याने शहरवासीयांची दाणादाण उडाली होती.
आता पावसाळ्याच्या तोंडावरच वादळाने जोरदार तडाखा दिल्याने पावसाळ्यात काय होइल या भितीने चाळीसगावकरांची गाळण उडाली आहे. त्यामुळे पुढील काळात आपातकालीन यंत्रणेने सजग राहण्याची गरज आहे.शहर पोलिस स्टेशन जवळ मोठा अपघात टळला या वादळात शहर पोलिस स्टेशनजवळील एक मोठे झाडे काेसळले. हे झाड कोसळत असतांना नेमके एक माल वाहतूक करणारे वाहन या झाडाखाली सापडल्याने ते दाबले गेले. या वाहनातील चालक सुदैवाने बचावला. मात्र या झाडाखाली वाहनासह रस्त्यालगतची छोटी दोन ते तीन दुकाने दाबल्या गेल्याने या दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. त्याचप्रमाणे नगरपालिकेसमोरील झाड पडल्याने वाहनांसह दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
महावितरणला मोठा फटका
या वादळाचा सर्वाधिक फटका महावितरणाला बसला. ठिकठिकाणी विजेचे ५० खांब वाकल्याने तसेच िवजेच्या तारा तुटल्याने वीज कंपनीचे नुकसान झाले, अशी माहिती कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांनी दिली. सर्वाधिक फटका स्टेशनरोड च हिरापूररोड डेअरी भागात बसला. यामुळे शहरातील बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित झाला. जवळपास ५० पेक्षा अधिक कर्मचारी, अधिकारी तसेच खासगी कॉन्ट्रक्टरच्या १० टीम शहरात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेत असल्याचे दिसून आले. शहरात टप्याटप्याने वीज पुरवठा सुरळीत केला जात आहे.
स्टेशन रस्त्यावरील वाहतूक ठप्प : शहरातील मुख्य रस्ता असलेला स्टेशन रस्त्यावर शहर पोलिस स्टेशनजवळ मोठे झाडे पडल्याने तसेच या झाडामुळे िवजेच्या ताराही तुटून रस्त्यावर आल्याने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यात या रस्त्याला छोट्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग असलेला व सर्वाधिक गर्दीच्या असलेल्या बसस्थानकासमोरील गणेशरोडवर गणपती मंदिरालगतचे झाडही रस्त्यावर पडल्याने येथील वाहतूकही बंद झाली. त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच धांदल उडाली. या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्याने अन्य रस्त्यांवर वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाली.
टिळक चौकात दुकानांसह वाहनांचे नुकसान
शहरातील टिळक चौक भागाला वादळाचा अधिक फटका बसला. येथील पालिकेची शाळा क्र. १ लगतचे मोठे निलबाचे झाड वादळामुळे उन्मळून पडल्याने त्याखाली एका कारसह दोन ते तीन दुचाकी तसेच तिन ते चार छोटी दुकाने दाबल्या गेल्याने मोठे नुकसान नुकसान झाले. वादळ थांबल्यानंतर नागरिकांनी धाव घेत पडलेले झाड बाजूला करीत दाबले गेलेली वाहने बाहेर काढली. दुसऱ्या दिवशीही येथे मदत कार्य सुरू होते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.