आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:अपघातात प्राैढाचा मृत्यू; कठाेऱ्यात अंत्यसंस्कार

चोपडा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कठाेरा येथील मूळ रहिवासी व सध्या आैरंगाबादमध्ये राहणाऱ्या सुधीर जाधव यांंचा कार अपघातात शुक्रवारी मृत्यू झाला हाेता. त्यांच्यावर आज काठाेरा या मूळ गावी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.कठोरा येथील सुधीर अशोक जाधव (वय ४३) हे औरंगाबाद येथील गंगापूर रोडवरून चारचाकीने जात असताना गाडी दुभाजकाला धडकल्यामुळे झालेल्या अपघातात त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १८ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली हाेती.

चोपडा तालुक्यातील कठोरा येथील एक सामान्य परिस्थितीतून पुढे आलेले सुधीर जाधव हे औरंगाबाद येथे स्वतःच्या कारखाना चालवत होते. दरम्यान, १९ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कठोरा या त्यांच्यावर मूल गावी शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...