आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा‎:कजगाव येथील बारा ज्योतिर्लिंग‎ मंदिरात उद्या प्राणप्रतिष्ठा सोहळा‎

कजगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भडगाव तालुक्यातील कजगाव येथील‎ स्टेशन रोडवरील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात बारा‎ ज्योतिर्लिंग मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराचा‎ प्राणप्रतिष्ठा सोहळा ५ रोजी होणार आहे. यानिमित्त ४‎ राेजी मूर्तीची मिरवणूक व कीर्तन आयोजित केले आहे.‎ ५ रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा हाेणार आहे. ४ रोजी मूर्तीची‎ सवाद्य मिरवणुक काढण्यात येईल.

तर रात्री सखाराम‎ महाराज कजगावकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम‎ आयोजित केला आहे. ५ रोजी सकाळी पूजा, विधीने‎ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. दुपारी‎ महाप्रसादाचे आयोजन केले आहे. भाविकांनी‎ मिरवणूक, प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचा लाभ‎ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...