आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलोख्यासाठी प्रार्थना:अमळनेरला शांतता, बंधुत्वासाठी नमाज अदा; गांधलीपुरा परिसरातील इदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी

अमळनेर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात शांतता व बंधुत्व टिकून रहावे यासाठी प्रार्थना करत, दुवा मागत मुस्लिम बांधवांनी गांधलीपुरा परिसरातील ईदगाह मैदानावर नमाज पठण करून ईद उत्साहात साजरा केली. लाऊड स्पीकर व भोंग्याच्या मुद्यावर बहुतेक मुस्लिम बांधवांनी नाराजी व्यक्त करत आपल्या दंडावर काळ्या फिती बांधून नमाज पठण केले.

मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हजारो मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर जमले होते. मौलाना नौशाद आलम यांच्या मागोमाग मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. कोरोनानंतर प्रथमच ईद व अक्षय्य तृतीयेचा योग जुळून आला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज बांधवांची गर्दी जमली होती. नमाज पठण केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी आपल्या पूर्वजांच्या कबरीवर जाऊन प्रार्थना केली. शुभेच्छा देण्यासाठी आमदार अनिल पाटील, माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते. दिशाभूल करण्याचा प्रयत्न अॅड.शकील काझी यांनी सांगितले की ज्या लाऊड स्पीकरच्या मुद्यावर अराजकता फैलावण्याचा प्रयत्न होत आहे. बेरोजगारी, महागाई आदी महत्वाच्या मुद्यांवर न बोलता सामान्य जनतेची दिशाभूल केली जात आहे. याला बळी पडू नये असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...