आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:धरणगाव येथे गोसेवा करणाऱ्यांचा केला गौरव; कामधेनू गोसेवा समिती पदाधिकाऱ्यांचा पुढाकार

धरणगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र दिनी कामधेनू गो सेवा समितीतर्फे वेळोवेळी गो सेवेसाठी पुढाकार घेणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सकल जैन समाजाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अजयशेठ पगारिया, महावीर पतसंस्था अध्यक्ष डॉ.मिलिंद डहाळे, शिवसेनेचे गटनेते पप्पू भावे, भाजपचे गटनेते कैलास माळी, ॲड.राहुल पारेख, श्रीपाद पांडे, विजय सोनार, रवींद्र बिचवे, राहुल जैन, प्रतीक जैन, प्रशांत देशमुख, बद्रीनाथ भाटिया, अजय महाजन, सिताराम मराठे, रामकृष्ण पाटील, दीपक कोष्टी यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच गुलाबराव वाघ यांनी मदतीचे आश्वासन दिले. कैलास माळी यांनी आपला पाच वर्षाचा नगरपालिकेचा भत्ता गोसेवा मंडळाला देण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच विजय ज्वेलर्सचे संचालक विजय सोनार यांनी त्यांच्या आई-वडीलांच्या स्मृती प्रित्यर्थ दोन दिवस गोसेवा जाहीर केली.

या वेळी गोसेवा समितीचे प्रवीण कुमट, सुभाष कटारिया, महेंद्र कोठारी, संजय ओस्तवाल, शांतीलाल कुमट, अरविंद ओस्तवाल, महेश सावला, रामलाल कुमट, हेमंत ओस्तवाल, सुमित संचेती, प्रकाश दोशी, हितेश बोथरा, मयूर चोपडा, राजेश पगारीया, दर्शन पगारीया, मुकेश पगारीया, सागर डेडिया, आलोक कुमट, भूषण मेहेर, मनोज मेहेर, दिनेश मेहेर, प्रवीण ओस्तवाल, रमेश ओस्तवाल, जितेंद्र ओस्तवाल, विपुल नगरीया, जतिन नगरीया, धिरज कोठारी, गितेश ओस्तवाल, राजमल संचेती, तुषार कुमट, दीपक संचेती, अक्षय मुथा उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...