आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्रताप महाविद्यालयात २ तास ठिय्या आंदोलन केले. महाविद्यालय परिसरात व महाविद्यालयाच्या वसतिगृहातील विविध समस्यांना घेऊन संतप्त विद्यार्थ्यांनी अभाविपच्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला.
या आंदोलनापूर्वी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी अनेकवेळा सर्व समस्या महाविद्यालय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. परंतु महाविद्यालय प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अभाविपशी संपर्क करून सर्व समस्या मांडल्या. तसेच अभाविपच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष वसतिगृहात जाऊन सर्व समस्यांची पाहणी करून प्राचार्यांना निवेदन सादर केले होते. त्याकडेही प्राचार्यांनी दुर्लक्ष केले. या सोबतच महाविद्यालयातील अन्य समस्या ही प्रशासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आणुन दिल्या होत्या. परंतु, महाविद्यालय प्रशासनानेही याकडे दुर्लक्षच केले होते. तर विद्यार्थी व कार्यकर्त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले.
साताऱ्याच्या विद्यार्थ्याचे तीन वर्षांचे झाले शैक्षणिक नुकसान
याच महाविद्यालयात शिक्षण घेतलेला सातारा येथील मारोती शिंदे हा विद्यार्थी २०१९मध्ये एमएस्सी उत्तीर्ण झाला. त्याला आजपर्यंत गुणपत्रक दिलेले नाही. चौकशीत विद्यापीठाने या विद्यार्थ्याला अपात्र ठरवले आहे. त्याने मायग्रेशन प्रमाणपत्र जमा केले नाही, असे विद्यापीठाचे म्हणणे आहे. मात्र, त्या विद्यार्थ्याने मायग्रेशनसह सर्व कागदपत्र महाविद्यालयात जमा केले आहेत. महाविद्यालय प्रशासन तशी कबुली दिली आहे. अशात महाविद्यालय व विद्यापीठाने समन्वयातून आतापर्यंत मार्ग काढायला हवा होता. परंतु, तसेच झाले नसल्याने या विद्यार्थ्याचे ३ वर्षाचे नुकसान झाले आहे. मारोती शिंदे याने आतापर्यंत साताऱ्याहून अनेकवेळा प्रताप महाविद्यालयाला भेट दिली व अर्ज सादर केला. परंतु, याकडेही महाविद्यालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
यांनी घेतला आंदोलनात सहभाग : विद्यार्थ्यांचे आंदोलन यशस्वी झाले असून आठ दिवसात सर्व प्रश्नांवर काम करण्याचे लेखी आश्वासन प्राचार्यांनी दिले. या आंदोलनात अभाविपचे प्रदेश सहमंत्री भावेश भदाणे, जिल्हा संयोजक इच्छेश काबरा, अमळनेरचे शहर मंत्री अमोल पाटील, तालुका संयोजक केशव पाटील, गौरव पाटील, मारोती शिंदे, जयेश सोनवणे, जितेंद्र बडगुजर, अनुज पाटील आदी विद्यार्थी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.