आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक:सेवानिवृत्त जवानाची अंतुर्ली येथे मिरवणूक

पाचोरा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील अंतुर्ली (नं.३) येथील सेवानिवृत्त जवानाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. २८ वर्षे देशसेवा करून घरी परतलेल्या जवानाचे गावकऱ्यांनी घरोघरी औक्षण केले. यावेळी ग्रामस्थांसह जवानाचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात मिरवणुकीत सहभागी झाले होते.पाचोरा शहरापासून जवळच असलेल्या अंतुर्ली (नं.३) येथील सुनील माणिक बच्छाव हे भारतीय सैन्य दलात सुभेदार पदावर कार्यरत होते. त्यांनी २८ वर्षे देशसेवा केल्यानंतर ते नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. दरम्यान, ३ नाेव्हेंबर रोजी ते आपल्या अंतुर्ली गावी परतले.

यावेळी ग्रामस्थांनी त्यांची गावातून मिरवणूक काढली. गावातील घरोघरी त्यांचे स्वागत करण्यात आले. गावातील सर्व महिलांकडून त्यांचे औक्षण करण्यात आले. या वेळी डिजेवर देशभक्तीपर गित लावण्यात आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली होती.

मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी सुनील बच्छाव यांचा सत्कार करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ग्रामस्थासह नातेवाईक मंडळीची मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी गावातील तरुणांचे माेठे सहकार्य लाभले.शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ग्रामस्थासह नातेवाईक मंडळीची मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी गावातील तरुणांचे माेठे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...