आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भव्य मिरवणूक:संत तुकाराम महाराज बीज महाेत्सवानिमित्त मिरवणूक‎

जळगाव‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री काथार (कंठहार) वाणी‎ समाज सेवा संघातर्फे जगद‌्गुरू‎ श्री संत तुकाराम महाराज बीज‎ महाेत्सवाचे ९ मार्च राेजी‎ सकाळी ८.३० वाजता शेठ नागाे‎ गणू वाणी मंगल कार्यालय व‎ छात्रालय गुजराथी गल्ली‎ जिल्हापेठ येथे आयाेजन‎ करण्यात आले आहे.‎ कार्यक्रमास प्रमुख पाहुणे‎ म्हणून पालकमंत्री गुलाबराव‎ पाटील, आमदार सुरेश भाेळे,‎ महापाैर जयश्री महाजन, विराेधी‎ पक्ष नेते सुनील महाजन,‎ उपमहापाैर कुलभूषण पाटील,‎ शिवसेना नेते विष्णू भंगाळे‎ उपस्थित राहणार आहे.‎

कार्यक्रमात सकाळी ८.३०‎ वाजता संत तुकाराम महाराज‎ यांच्या प्रतिमेचे पूजन, दुपारी ४‎ वाजता भव्य मिरवणूक, रात्री ८‎ ते १० वाजता महाप्रसादाचा‎ कार्यक्रम हाेणार आहे. या‎ कार्यक्रमास सहभागी व्हावे,‎ असे आवाहन संत तुकाराम‎ महाराज बीज महाेत्सव‎ समितीचे प्रमुख याेगेश वाणी,‎ उपसमिती प्रमुख किशाेर वाणी,‎ नीलेश वाणी, रामप्रसाद वाणी,‎ शंकर वाणी यांनी केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...