आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याख्यान:प्रा. श्रीपाल सबनीस यांचे आज एरंडोलला व्याख्यान

एरंडोलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित महात्मा फुले हायस्कूलतर्फे ३ जानेवारीला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले हायस्कूलतर्फे मंगळवारी सायंकाळी ७ वाजता महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ प्रा. श्रीपाल सबनीस यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार चिमणराव पाटील राहणार असून द्वीप प्रज्वलन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सुधीर तांबे, भाजपचे लोकसभा प्रवास संपर्क प्रमुख अॅड. किशोर काळकर, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांच्या हस्ते करण्यात येईल. शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी विकास पाटील, ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नाना महाजन यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात येणार आहे. व्याख्यानास उपस्थिती द्यावी, असे संस्थेचे अध्यक्ष विजय महाजन, सचिव सुकलाल महाजन, अरुण माळी आदींनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...