आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम‎:चोपड्यातील हरेश्वर मंदिरात‎ खंजिरी भजनांचा कार्यक्रम‎

चोपडा‎5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कोळंबा येथील श्री‎ गुरुदेव सेवा मंडळ व जळगाव‎ जिल्हा जय गुरुदेव संगतचे प्रार्थना‎ गायक खंडू वामन बाविस्कर उर्फ‎ खंडुजी महाराज यांच्या धम्माल‎ खंजिरी भजनाचा कार्यक्रम चोपडा‎ येथील श्रीक्षेत्र हरेश्वर महादेव‎ मंदिरात घेण्यात आला.‎ या कार्यक्रमात विविध‎ सामाजिक, अध्यात्मिक, धार्मिक‎ भजन व भावगीत सादर करण्यात‎ आले. या कार्यक्रमाचे शहरातील‎ महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे‎ तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ‎ बाविस्कर यांनी आयोजन केले

होते.‎ छायाचित्रकार मुन्ना रायसिंग यांनी‎ या वेळी सहकार्य केले. कैलास‎ परदेशी (हार्मोनियम), नरेंद्र गुरव‎ (तबला), टाळकरी व सहगायक‎ म्हणून एकनाथ महाराज, हरिश्चंद्र‎ महाराज, प्रताप महाराज, दिलीप‎ महाराज यांनी संगीत साथ दिली.‎ साऊंड सिस्टिमसाठी सुरेश महाराज‎ यांनी सहकार्य केले. प्रारंभी खंडू‎ महाराज यांनी ईशस्तवन, नाम धून‎ सादर करून //"सब मिलकर करते‎ है..स्वागत आज तुम्हारा’ हे गीत‎ सादर करून मान्यवरांचा सत्कार‎ केला. या प्रसंगी मंदिराचे प्रमुख‎ ओंकारनाथ महाराज, कोळी समाज‎ संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश कोळी‎ , बी. एन. पाटील उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...